अन हेल्पिंग ‘हॅन्ड’मुळे ‘त्या’ विद्यार्थ्यांची पायपीट थांबली!

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना काळात (Corona Crisis) आई-वडील गमावलेल्या अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना चांदवड येथील हेल्पिंग हँड ग्रुप (Helping Hand) व चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील (Tahsildar Pradip Patil) तसेच संगमनेर येथील साई समर्पण फाउंडेशन (sai Samarpan Foudation) वतीने पाच विद्यार्थ्यांना सायकल वाटप व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

चांदवड येथील हेल्पिंग हॅन्ड ग्रुपच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आली होती की गरजू विद्यार्थ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी हातभार लावावा. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) इतर ठिकाणाहून अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी या मान्यवरांकडून फुल ना फुलाची पाकळी अशी मदत झाली. त्यामुळे हि मोहीम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. चांदवड येथील प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात पाच विद्यार्थ्यांना सायकल वाटप व २५ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

चांदवड येथील हेल्पिंग हँड ग्रुप नेहमी समाजातील वंचित व गरीब लोकांसाठी अनेक उपक्रम राबवत असतो. यामध्ये केरळ येथे आलेल्या सुनामी मध्ये नागरिकांना घरगुती साहित्याचे वाटप, तसेच कोल्हापूर येथे आलेल्या पुरात नुकसान झालेले नागरिकांसाठी मदत, पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, तसेच कोरोना काळात मुंबईहून परराज्यात स्थलांतरीत होणाऱ्या पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व लहान मुलांसाठी हजारो लिटर दुधाची व्यवस्था करून अभिनव प्रयोग करत नागरिकांना सहकार्य केले.

तसेच चांदवड येथील डोंगरगाव ते दुगाव येथे शिक्षण घेण्यासाठी दहा ते पाच किलोमीटर पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Students) पायपीट थांबवण्यासाठी पुढाकार घेत चांदवडचे माननीय तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम आयोजित केला.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सायकल चांदवड येथील गुरुकृपा सायकलचे दुकानाचे मालक राम कंकरेज यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी ग्रुपचे हर्षल गांगुर्डे, देविदास हिरे, भाऊसाहेब जाधव, पांडुरंग भडांगे, विकी गवळी, धनंजय पाटील, राम बोरसे, नितीन फंगाळ, दिपक निकम, सुनील काळे ,अमोल गांगुर्डे, नितीन ठाकरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते