नाशिकच्या मोहदरी घाटात भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

नाशिक : सिन्नर महामार्गावरील कालच्या (Accident on Sinnar Highway) विचित्र अपघाताची घटना ताजीच असताना सिन्नर मोहदरी घाटात पुन्हा एक भीषण अपघात (Another terrible accident at Sinnar Mohdari Ghat) झाला आहे. वाहनांचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. वाहनांचे टायर फुटल्याने वाहनाने डिव्हायडर ओलांडून थेट दुसऱ्या लेनला जात आणखी एका वाहनाला धडक दिली. दरम्यान या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू (Four people died in the accident) झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

टायर फुटलेल्या गाडीत चारजण होते. हे चारही जण महाविद्यालयीन विद्यार्थी होते. गाडीचे टायर फुटल्याने वाहनाने डिव्हायडर अलंडले आणि गाडी थेट दुसऱ्या लेनला मध्ये गेली आणि या ठिकाणी असलेल्या आणखी एका वाहनाला धडक दिली. तर ज्या गाडीला धडक बसली त्यातीलही प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा पुढील उपचार सुरु आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

या भयानक अपघातात अपघातग्रस्त गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर दुसरी गाडी देखील एका बाजूने चेंदामेंदा झाली आहे. गाड्यांची ही परिस्थिती पाहून हा अपघात किती भीषण असेल याची जाणीव होते. काल झालेल्या अपघातानंतर हा दुसरा भीषण अपघात समोर आल्याने नाशिक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असल्याचे दिसून येत आहे.

या घटनेत अपघात ग्रस्त गाड्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. घटना आताच ब्रेक झाली असून सविस्तर वृत्त लवकरच..

अपघाताचा थरारक व्हिडिओ; चेंदामंदा झालेल्या कार

काल पळसे गाव चौफुलीवर झालेल्या अपघात ताजाच असताना पुन्हा एक भयंकर अपघात समोर आला आहे. कालच्या अपघातात बसचे ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले असे बस चालकाचे म्हणणे होते. त्यामुळे बस पुढील एका बसवर आदळली. दरम्यान भरदाव बुससोबत २ दुचाकीस्वार फरफटत आले आणि ते दोघेही चिरडले गेले. तर आजचा अपघात टायर फुटल्याने घडला आहे. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहनांची देख्रेक करणे गरजेचे आहे हा मुद्दा अधोरेखील होत आहे.