‘अशी’ होणार प्रभाग रचना; पालकमंत्री दादा भूसेंनी दिली माहिती

नाशिक : दहा महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने आयुक्तांना दिले आहे. दरम्यान प्रभाग रचनेबद्दल बोलताना पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचना होणार असून यात थोडेफार बदल होणे अपेक्षित आहे. अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. मात्र निवडणुका कधी होईल हे सांगता येत नाही अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.

नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मला विश्वासात घेतले जात नाही, बैठकांना बोलवले जात नाही, असे आरोप सुहास कांदे यांनी केले होते. यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यावेळी काही प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री यात लक्ष घालतील असं म्हणत भुसे यांनी यावर बोलणं टाळलं होतं. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही, कालही आम्ही सोबत होतो असं म्हणत ‘हम साथ साथ है’ चा दावा केला आहे.

गोवर लसीकणाबाबत जनजागृती मोहिम

दोन दिवसांआधी आधार आश्रमात ४ वर्षीय मुलाच्या झालेल्या हत्येच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यासोबतच नाशिकमध्ये गोवरने एन्ट्री केली आहे. मात्र मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना लसीकरण करण्याचे आदेश दिले असून मालेगावात लसीकरण जनजागृती मोहिमेत काही धार्मिक गुरूंनाही सहभागी करून घेणार आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कर्नाटक प्रश्न

कर्नाटक-महारष्ट्र सीमावाद सध्या वर आलं आहे. ४० गावांवर कर्नाटकाने दावा केल्यानंतर राजकारण तापलेले दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नागरिक ही गोष्ट मुळीच सहन करणार नाही असं भुसे म्हणाले आणि विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याचं कुणाच्या मनात असेल असं वाटत नाही. खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवलाय, १०५ हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय. विकास आणि काही अडचणी असतील तर त्यावर एकत्र बसून मार्ग काढू. मात्र अशी मागणी कुणीही करणार नाही असा विश्वास दादा भूसेंनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना, कालपर्यंत आम्ही होतो तेव्हा खूप चांगले होतो आणि आज अचानक वाईट झालो. आम्ही आहोत तसेच आहोत. असा टोला यावेळी भूसेंनी लगावला आहे. तसेचं कांदा हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून नाफेडने इतर राज्यात कांदा पाठवणे अपेक्षित आहे. कांद्याचे भाव पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे नाफेडने कांदा खरेदी करावी, यासाठी पाठपुरावा करतोय. अशी माहितीही देण्यात आली आहे.