नाशिक | प्रतिनिधी
नाशिकरोडच्या प्रसिद्ध अशा चलनी नोटांच्या कारखाना आवारात भीषण आगा लागल्याची घटना घडली आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
नाशिक शहरातील नाशिकरोड भागात असणाऱ्या चलनी नोटांचा देशातील सर्वात मोठा कारखाना आहे. या कारखान्याच्या आवारात आज दुपारच्या सुमारास गवताच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर धुराचे लोट आणि आग भडकल्याने परिसरात पळापळ झाली आहे.
सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. फक्त नोटप्रेस च्या आवारातील गवताला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.