सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात भीषण आगडोंब

नाशिक | प्रतिनिधी

सातपुर येथील औद्योगिक वसाहतीतील मिराज इंडस्ट्री कारखान्यास बुधवारी पहाटेच्या अचानक आग लागली.

प्राथमिक माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मिराज इंडस्ट्री नावाच्या कारखान्यात भीषण आगडोंब उसळला आहे. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती मिळते आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे नऊ बंब दाखल झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर साडेचार तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना विझविण्यात यश आले आहे.