‘मला संताप येतोय, वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी..’, उदयनराजे आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुरु असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्याचा वातावरण तापेलेले आहे. तरी मात्र एका नंतर एक वादग्रस्त वक्तव्य समोर येतच आहे. यामुळे आता उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर मला संताप येत आहे, असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी’ असं म्हणत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

सातारा येथे बोलताना उदयनराजे आक्रमक झाले ‘तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही’ असे म्हणत उदयनराजे पुन्हा एकदा भावुक झाले.

‘मी लढणारा आहे, मी रडणारा नाही, मी त्या दिवशी भावुक झालो होतो, शिवाजी महाराजांचा अवमान होता कामा नये नाहीतर नावच पुसून टाका म्हंटल्यावर मी भावुक झाल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान उदयनराजे यांच्या या संतापानंतर ‘शिवरायांचा अपमान कोणीही केलेला नाही, शिवरायांचा अपमान कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज इथे उभे आहोत, एकमेकांशी बोलायला. महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला असे तुम्ही बोलताय ते राज्यपाल पायी गेले होते शिवनेरीला, संजय राऊत नाही गेले ते हेलीकॉप्टर ने गेले. हिम्मत असेल तर त्यांनी शिवनेरीच्या पायऱ्या पायी चढाव्या. जे राज्यपाल शिवनेरीवर या वयात पायी गेले, त्यांच्या मनात छत्रपती शिवरायांबद्दल अनादर कसा असेल. त्यांच्या मनात शिवरायांवर एवढा आदर आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे एवढा गदारोळ का? उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. शिवनेरीवर पायी जाऊन छत्रपतींचे दर्शन घेतलं त्या राज्यपालांकडून बोलण्यात एकादी गोष्ट चुकीची झाली असेल. पण हा विषय त्यांनी इथेचं थांबवावा, ही विनंती आहे.