‘अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज नाही’,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच अपघातात जखमी झालेले धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घेतली. ही घटना ताजीच असतानाच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लक्ष करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे आणि अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे.

त्या एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. दरम्यान ‘काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं, अशी टीका त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ‘मी केलेली काम मोजण्याची मला सवय नाही. मी हे केलं ते केलं असं मोजायची मला सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर माझ्या निधीवर बदलून स्वतःचे नाव टाकले असेही मला बघायला मिळाले आहे. मात्र अशा चिल्लर गोष्टी करण्याची मला कुठलीही गरज नाही. मुंडे साहेबांनी मला असं कधी शिकवलं नाही’ असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला आहे.

धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात झाला होता. यात ते जखमी झाले. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. ही घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून स्वतःचं नाव टाकलं’ असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मी हे केलं ते केले असं मला कधी मोजायची सवय नाही. लोकांनी तर माझ्या कामावर, माझ्या निधीवर  बदलून स्वतःचे नावं टाकले असेही मला बघायला मिळाले. पण अशा चिल्लर गोष्टी करायची मला गरज, नसून मुंडे साहेबांनी मला असे कधी शिकवलं नाही,” – भाजप नेत्या पंकज मुंडे

त्यांच्या या वक्तव्यांनंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानावर धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात का? हे पाहावं लागणार आहे.