नाशिक : संजय राऊत यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवी दिली होती. यावर बोलताना ‘मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो, त्यांना उत्तम शिव्या येत असतील तर आधी राज्यपालांना, भाजप मंत्री आणि प्रवक्त्यांना देऊन दाखवाव्यात, आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवर फुल उधळू. छत्रपतींचा आणि सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल. अशा शब्दांमध्ये राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.
सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न चांगलाव्ह पेटला आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील काही गावांवरचं दावा केला. तर महाराष्ट्रात कन्नड भवन उभारण्याची घोषणा केली . यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘हा देश एक फेडरल स्टेट आहे. अनेक राज्यांचा बनून देश बनला आहे. हे संस्थान नाही..सगळ्या राज्यांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहे..कर्नाटकशी सुद्धा..मुख्यमंत्री नवस फेडायला गुवाहाटीला गेले मी नवीनच ऐकलं किई त्यांनी आल्यावर आसाम भवन उभारण्याची घोषणा केली..याचाआनंद आहे..यामुळे राष्ट्रीय एकात्मका घट्ट होते. दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सोलापूरला कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली असेल तर बेळगाव आणि बंगळूरला महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय व्हावा मग आम्ही तुमचा विचार करू..आमचं राज्यांशी भांडण नाही’. मुंबईत देखील कानडी बांधवांचे भवन उभारले आहेत..अनेक हॉल आहेत..आमचा त्यांच्याशी वाद नाही..पण एका इर्षेने तुम्ही हे करणार असाल तर आम्हाला देखील बेळगावमध्ये महाराष्ट्र सदन उभारायला जागा द्या’ असं राऊत म्हणाले.
सामनाच्या लेखात भाजपची तुलना नागाशी करण्यात आली, याबद्दल बोलताना महाराष्ट्रात ढोंग्यांची लाट आली आहे. सरकारचं हे कुठलं शिवप्रेम आहे. मोदींना रावण म्हंटल्यावर यांची अस्मिता जागी होते. मात्र महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान झाल्यावर थंड पडते तिथे तुमचा नाग फना काढत नाही असं म्हंटल आहे मी, त्यात काय चुकीचे आहे. असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे. दरम्यान ‘मी उदयन राजेंच्या भावनेशी सहमत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना नंतर त्यांनी जागृकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. असं राऊत म्हणाले.
संजय राऊत ऑन लव जिहाद
‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत एकदा सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. हे लव जिहाद आहे की आणखी काही..आफताब श्रद्धा हत्याकांडाचा विषय निर्घृण आहे. अनेक हिंदू मुलांकडूनही मुलींच्या हत्या झाल्या आहेत. ही विकृती आणि अमानुषता आहे. जात धर्माचा विषय नाही, प्रत्येक मुलीचे रक्षण व्हायला हवं’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.