Home » नाशकात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगणारे गजाआड

नाशकात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगणारे गजाआड

by नाशिक तक
0 comment

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथे (Wadivarhe’ Igatpuri taluka) पोलिसांनी अवैधपणे हत्यारे बाळगणाऱ्यांच्या (Two people arrested for illegally carrying weapons) मुसक्या आवळल्या आहेत. गोंदे एमआयडीसी परिसरात (Gonde MIDC area) काहीजण अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे (firearms) बाळगुन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने या परिसरात दाखल होत संशयितांना हत्यारांसह शिताफीने ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे अवैध हत्यारे बाळगणारे दोन इसम अटकेत आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील (Squad of Local Crime Branch) अंमलदार वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना काही संशयित गोंदे एमआयडीसी परिसरात अवैधरित्या घातक अग्नीशस्त्रे बाळगुन काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने पावले उचलले त्यानुसार सांगितलेल्या घटनास्थळी पोलिस पथक पोहोचले असता त्यांना दोन इसम हत्यारांसह आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांच्याकडे १ रिकामे काडतूस (1 empty cartridge) आढळून आले आहे.

विनापरवाना बेकादेशीररित्या घातक अग्नीशस्त्रे (Deadly firearms) कब्जात बाळगतांना हे दोघे संशयित मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द वाडीव-हे पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे (Indian Arms Act Section 3/25) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक संशयित हा सराईत गुन्हेगार असून त्यच्यावर यापूर्वी खंडणीसह दरोडा, दंगे, इतरांना दुखापत करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेत सराईत गुन्हेगार हत्यारांसह आढळल्याने शस्त्र घेऊन काहीतरी मोठा गुन्हा करण्याचा प्रयत्न असावा असा अंदाज लावण्यात येत आहे. दोघे संशयित ताब्यात असून या दिशेने त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

वैध हत्यारांचा मुद्दा उपस्थित

याआधीही नाशिक जिल्ह्यासह शहरात अवैध हत्यारे बाळगून गुन्हेगारांनी घातलेला हैदोस नाशिककरांनी अनुभवला आहे. काही दिवसांपूर्वीच सातपूर- अंबड लिंक रोडवर अवैध व्यवहारातून मिळालेल्या पैशाच्या वादातून गोळीबार केल्याची (Firing on Satpur-Ambad link road over money received from illegal transactions) घटना समोर आली होती. यामुळे गुन्हेगारीचा व अवैध हत्यारांचा मुद्दा उपस्थित होत आहे. यावर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. यावर पोलिस प्रशासन की कारवाई करेल हे पाहणं महत्वाचे ठरेल.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!