महत्त्वाची बातमी: देशात आजपासून ‘या’ गोष्टींवर बंदी.

By चैतन्य गायकवाड

नवी दिल्ली : प्लास्टिकपासून ज्या वस्तू बनवण्यात आलेल्या आहे, त्यामुळे पर्यावरण धोक्यात येते. कारण प्लास्टिकपासून बनवलेल्या या वस्तूंचे लवकर विघटन होत नाही. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून म्हणजेच, १ जुलै २०२२ पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. यामध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे, त्या वस्तूंची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यादी जाहीर केली आहे.

जर कोणी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करताना आढळलले तर, त्यांना शिक्षा केली जाईल, असे पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम १५ अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

*या गोष्टींवर बंदी

🔅 प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या)

🔅 प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स

🔅 फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक

🔅 प्लास्टिकचे झेंडे

🔅 कँडी स्टिक, आयस्क्रिम स्टिक

🔅 थर्माकोल (पॉलिस्ट्रिन)

🔅 प्लास्टिकच्या प्लेट

🔅 प्लास्टिकचे कप

🔅 प्लास्टिकचे ग्लास

🔅 चमचे

🔅 चाकू

🔅 स्ट्रॉ

🔅 ट्रे

🔅 मिठाईच्या डब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद

🔅 इन्विटेशन कार्ड

🔅 सिगरेटचे पॅकेट

🔅 १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर

🔅 स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी)

दरम्यान, सिंगल युज प्लॅस्टिक (एसयूपी) कुठे बनवले जात आहे, आयात केले जात आहे, साठवले जात आहे, विकले जात आहे किंवा बेकायदेशीरपणे कुठे वापरले जात आहे का, यावर राज्य सरकार बारीक लक्ष ठेवणार आहे. सध्या FMCG क्षेत्राला या बंदीतून सूट देण्यात आली आहे. पण पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य आहे का, याची काळजी घ्यावी लागेल.