महत्वाची बातमी..! नाशिक च्या ‘या’ भागात उद्या पाणी पुरवठा बंद

नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलकुंभावर पाइपलाइन जोडणीचे काम करण्यात येणार आहे. कामाचे स्वरूप मोठे असल्याने काम होण्यासाठी वेळ लागणार आहे.
त्यामुळे नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ विभागीय आयुक्त कार्यालय व प्रभाग क्रमांक १९ मधील ओढा रोड व परिसरात शुक्रवारी (ता. २२) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, शनिवारी (ता. २३) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडून कळविण्यात आले आहे.