गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चे दर गगनाला भिडत होते. महागाई ने जनता होरपळली होती.त्यात पेट्रोल १२० रु. लिटलच्याही पार गेले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या करात कपात केली होती. केंद्र सरकारने मूल्यवर्धित(VAT) कर कमी करावा अशी सूचना दिली होती. पण राज्यात ठाकरे सरकार होते,पेट्रोल डिझेलवरील कर एवढा एकच उत्पन्नाचा मार्ग आहे असे सांगत ह्या सूचना मान्य केल्या नाहीत. पण राज्यात सत्ताबदल झाला, नवे शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित करात(VAT) कपात केली.यामुळे आज पासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल च्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या. पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले.पण आपल्या शेजारील राज्य गुजरात मध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल 9 रुपयांनी आणि डिझेल 1.50 रुपयांनी स्वस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कालच्याच बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील करात (VAT) कपात करायचा निर्णय घेतला.हा निर्णय १५ जुलैपासून अंमलात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेनी केली .पेट्रोल वरील कर कमी झाल्याने प्रतिलिटर पेट्रोल मागे ५ रुपयांनी तर प्रतिलिटर डिझेल मागे ३ रुपयांनी स्वस्त झाले. तर राजधानी मुंबई मध्ये पेट्रोलचे आजचे नवा दर प्रति लिटर १०६.३५ रुपये तर डिझेलचा नवा दर प्रति लिटर ९४.२८ रुपये एवढे आहे.
नंदुरबार मध्ये १०६.९५ रुपये प्रतिलिटर असा दर आहे. पण आश्चर्य म्हणजे गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये प्रतिलिटर इतका आहे. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र यांतील पेट्रोलच्या दारात ९ रुपयांची तफावत आहे.आणि तसेच नंदुरबारमध्ये डिझेलचे दर ९४.४५ रु प्रति लिटर आहे. तर गुजरातमध्ये ९३ रुपये प्रतिलिटर इतके आहे.
जे नंदुरबारचे नागरिक गुजरात सीमेवरती राहतात ते महाराष्ट्र राज्यात पेट्रोल भरण्यापेक्षा गुजरात च्या पेट्रोलपंपावरती गर्दी करत आहेत.कारण गुजरात मध्ये ९ रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. गुजरातसहित इतर भाजपशाशित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी असताना आपल्याच राज्यात हे दर का असा प्रश्नही नागरिकांनी सरकार ला विचारला आहे.