चांदवडमधील ‘त्या’ खुन प्रकरणात तक्रारदार पत्नीलाच घेतले ताब्यात !

नाशिक : चांदवड कातरवाडी येथे दोन दिवसापूर्वी सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी हल्ला करून खून (Chandwad, Katarwadi murder case) केला होता. या घटनेची माहिती मिळतात मनमाड पोलीसांनी घटनेचा छडा लावत खुनाच्या आरोपात संशयित आरोपी पत्नीसह तिच्या दोघा साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil) यांच्या मार्गदर्शनात हा तपास करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील सोपान बाबुराव झाल्टे यांची राहत्या घरात हत्या झाली (Sopan Baburao Zalte was murdered in his residence) होती. बाबुराव झाल्टे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले असताना अज्ञातांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सोपान बाबुराव झाल्टे हे जागीच मयत झाले होते. तर त्यांचे वडील बाबुराव महादू झाल्टे हे जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे आणि चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर तसेच कर्मचारी यांना कळतात घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवड पोलीस स्टेशनला सोपान बाबुराव झाल्टे यांची हत्या झाल्यानंतर संशयित आरोपी पत्नीनेच तक्रार दाखल केली होती. मनीषा सोपान झाल्टे असं संशयित पत्नीचे नाव असून तिच्या तक्रारीवरूनच प्रकरणाचा तपास सुरू होता. तर तपासा अंती हत्येची तक्रार दाखल करणाऱ्या पत्नीलाच खुनाच्या आरोपात ताब्यात घेतलं आहे. तिच्यासह तिचे इतर दोन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत सोपान बाबुराव झाल्टे यांची खुनाच्या आरोपात पत्नी मनीषा सोपान झाल्टेसह तिचे सहकारी सुभाष संसारे (रा. कातरवाडी ), खलील शहा (रा. मनमाड) असे तीन संशयित आरोपी पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपी चांदवड पोलीस स्टेशन ताब्यात आहे.

या घटनेचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे, चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कर्मचारी मंगेश डोंगरे, उत्तम गोसावी, अमोल जाधव, विजय जाधव, कीर्ती संसारे, पालवे, गुळे, राजेंद्र बिन्नर, आदी कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या मदतीने सुरू आहे.