Income Tax Raid: नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे; औद्योगिक क्षेत्रात खळबळ 

नाशिक शहरात (Nashik) एकाच वेळी 15 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने (Income Tax Raid) छापे टाकल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरात (Nashik) एकाच वेळी 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या (Builder) कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Raid) छापे टाकल्याचे समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एकाच वेळी झालेल्या छापीमारीने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

मागील काही महिन्यात महाराष्ट्रासह देशभरामध्ये आयकर विभागाच्या मार्फत विविध ठिकाणी छापेमारी करत करबुडव्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने (Delhi Unit) छापे टाकले असून आयकरात तफावत असल्याचा ठपका अनेक बांधकाम व्यवसाययिकांवर ठेवण्यात आला आहे.  

नाशिकमध्ये 15 हुन अधिक बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारी सकाळपासून छापे टाकले आहेत. या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात महात्मा गांधी रोड (MG Road), कुलकर्णी गार्डन यांसह शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या 15 अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या दिल्ली पथकाने ही कारवाई केली असून आयकरात तफावत असल्याचे जाणवल्याने छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

यातील अनेक बांधकाम व्यावसायिक नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांशी संबंधित असल्याने या कारवाईनंतर औद्योगिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

शहरात एकाचवेळी 15 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी अनेक ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. 

बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ

आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते. त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही.

आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे.

source : abp mazha