Home » नाशकात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट; पोलीस ॲक्शन मोडमध्ये

नाशकात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट; पोलीस ॲक्शन मोडमध्ये

by नाशिक तक
0 comment

नाशिक : तालुक्यासह शहरात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून यावर कडक उपायोजनांची मागणी जोर धरत होती त्यामुळे पोलीस आता या चोरट्यांविरोधात ॲक्शन मोडमध्ये असून सिन्नर पोलिसांनी धडक मोहीम राबवत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे. सोबतच त्याचाकडून २ मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. हा सराईत गुन्हेगार असून खूप दिवसांपासून पोलिसांना याचा शोध होता. बालाजी विष्णू माने (रा.संत गाडगे बाबा नगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर या अगोदर मोटारसायकल चोरी जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हिरो होंडा मोटारसायकल (क्र. MH. १५ . bm .७५५५) ही मोटारसायकल सिन्नर बसस्थानक आवारातून चोरीस गेली होती सदर मोटारसायकल चोरीचा सिन्नर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर रीत्या तपास सुरू होता. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रवींद्र वानखेडे, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, हे शहरात मोटारसायकल चोरट्यांबाबत माहिती काढत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की १ चोरटा शहरातील आडवा फाटा परिसरात येणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आडवा फाटा परिसरात सापळा रचत या चोरट्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरची मोटारसायकल ही शहरातील बसस्थानक परिसरातून चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्याने नाशिक रोड परिसरातून, शिर्डी, परभणी ह्या भागांतून ३ मोटारसायकल लंपास केल्या होत्या.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!