नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतून सतत चोरीचे प्रकार घडत असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून वेगवेगळ्या भागातून ४ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन चोरी झाले, त्यामुळे शहरात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस नक्की कुठे गस्त देत असतातच हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच शहरात या सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांचा या चोरट्यांना अजिबातच धाक नसल्याचे स्पष्ट होते. जे दुचाकी वाहने चोरी गेली आहेत ती शहरात म्हसरूळ, गंगापूर, ठक्कर बाजार, सातपूर या भागांतील असून या परिसरात खळबळ उडाली आहे. ही चारही वाहने पार्किंग मधून चोरी गेलेले असून या चोऱ्या दिवसा ढवळ्या झाल्या आहेत.
तसेच, टाकळी रोड, द्वारका भागात इमारतीच्या शेजारी उभी असलेले चारचाकी वाहन चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटना दिवसेंदिवस वाढतातच आहे. या सर्व घटनांमुळे शहरात नागरिक सुरक्षित आहेत का असे प्रश्न विचारले जात आहे. नाशिक मध्ये गुन्हेगारीच प्रमाण देखील मागे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. आणि आता चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतेय त्यामुळे शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का ? असा सवाल सर्व स्तरांतून उपस्थित होत आहे.