नाशिकमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; अनेक धरणांतून विसर्ग वाढवला.

नाशिक: शहरासह जिल्ह्यात (Nashik District) पावसाने काल दिवसभर विश्रांती दिली होती. मात्र, आज पुन्हा पावसाची जोर’धार’ सुरू झाल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत अधिक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. अशात धरणांतून कमी करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे.

मागील ८ – १० दिवसांत सुरू असलेल्या पावसाने जिल्हाभरात सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळी लक्षणीय वाढ झाली आहे. अशात पावसाने अल्पशी विश्रांती दिल्यानंतर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा पावसाने जोरदार ‘कमबॅक’ केल्याने जिल्ह्यातील काही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यात

करंजवण (Karanjavan Dam) – ४७३० क्युसेक

दारणा (Darna Dam) – ४००० क्युसेक

पालखेड (Palkhed dam) – १४,३८० क्युसेक

वाघाड (Waghad Dam) – १७०० क्युसेक

तर गंगापूर धरण, मुकणे धरण, वालदेवी धरण आणि आळंदी (Gangapur, Mukne, Waldevi and Aalandi dam) धरणातून पाण्याचा विसर्ग आहे ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात पाऊस जोरदार फायरिंग करत आहे. जून अखेरीस पाणीकपातीचे सावट असताना पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाशिकारांची चिंता मिटली. एवढच काय तर नाशिककरांना वर्षभर पुरेल एवढे पाणी सध्या धरणांत उपलब्ध आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरण १०० टक्क्यांवर आहे. तर बऱ्याच धरण्साठ्यंत विलक्षणीय वाढ झाली आहे. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशात जिल्हाभरात नद्यांना आलेल्या पुराचे रौद्ररूप देखील पाहायला मिळाले आहे. तर पावसाने घातलेल्या थैमानाने जिल्ह्यात जीवितहानी व वित्तहानीच्या अनेक घटना देखील घडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणं (Nashik Dam) ओव्हर फ्लो झाले असून आज पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्कतेचे इशारे देखील देण्यात येत आहे.