नाशकात NIA आणि ATS छापीमारेची व्याप्ती वाढली ; PFI चे ४ जण ताब्यात

पी एफ आय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर सुरू असलेली तपास यंत्रणांची छापीमारेची व्याप्ती वाढत चालली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी एन आय ए आणि एटीएस पथकं या संघटनेवर छापे टाकत आहेत. नाशकात देखील छापे टाकत या संघटनेतील काही सदस्य ताब्यात घेतले आहे. नाशकात आतापर्यंत या संघटनेतील चार जणांना तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे.

संशयित गुलदस्त्यात..

सकाळी केलेल्या कारवाईनंतर एन आय ए आणि एटीएस पथक दोघा संशयीतांना घेऊन एटीएस कार्यालयात पोहोचले होते. मालेगाव येथील पीआयएफचा जिल्हाप्रमुख मौलाना सैफू रहमान आणि आणखी एकाला त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान आता आणखी दोन नव्या संशयतांना एटीएस कार्यालयात आणण्यात आलं आहे. त्यामुळे सैफू रहमान सह चार जण एटीएस कार्यालयात आहेत. मात्र अन्य तिघे संशयित नेमके कोण ? हे तपास यंत्रणांकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे आणि अतिशय गोपनीय पद्धतीने पथकांची चौकशी सुरू आहे.

टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात छापेमारी

एनआयए आणि ईडीकडून टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी पीएफआयचे अध्यक्ष परमेश आणि त्यांच्या भावाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीएफआयचे राष्ट्रीय सचिव बीपी नझरुद्दीन यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. देशाभरातील १३ राज्यांमध्ये छापेमारीचे काम चालू आहे. एनआयए आणि ईडीकडून शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. तर हळूहळू ही संख्या वाढत असून एन आय ए आणि एटीएस पथकाच्या कारवाईची व्याप्ती वाढत असल्याचं चित्र आहे.

धोका असल्याचा अलर्ट..!

एटीएसची छापेमारी संपूर्ण राज्यात सुरू असून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून पीएफआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष मौलाना सैफू रहमान याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर सैफू रहमान अन्य तीन जण देखील नाशिकमधून ताब्यात घेतले आहेत. राज्यातील बीड, औरंगाबाद, परभणी, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई सह मालेगावमध्ये ही छापीमारी सुरू आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष बाब म्हणजे या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख फॅमिली अकाउंट असल्याची माहिती मिळाली आहे या खात्यामध्ये फॅमिली मेंटेनेस च्या नावाखाली कतार, कुवैत आणि सौदी अरेबियातून ५०० कोटी रुपये आल्याची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे आता देशातील अनेक राज्यांमध्ये व्यापक होत चाललेल्या छापीमारीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.