मुंबई | प्रतिनिधी
कोरोनाचा अद्याप हद्दपार झाला नसून या व्हायरस चा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. एक्स ई प्रकारातील हा व्हेरिएंट असून तो मुंबईत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र अशातच मुंबईत आजच्या अहवालातून हा रुग्ण आढळून आला आहे. कोविड व्हायरस अनुवांशिक सूत्र निर्धारण चाचणीसाठी २३० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी एक नमुना ‘एक्स ई’ व्हेरिएंट आणि इतर नमुने कापा व्हेरिएंटने बाधित असल्याचे आढळून आले आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
डायन जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की कोरोनाव्हायरस प्रकार एक्स ई ओमीक्रोन हा कोरोना व्हायरसच्या BA.1 आणि BA.2 या दोन संकरित मिळून तयार झाला आहे. जानेवारीमध्ये युनायटेड किंगडममध्ये हा प्रकार आढळून आला होता, असे जागतिक आरोग्य एजन्सीने आपल्या साप्ताहिक एपिडेमियोलॉजिकल अपडेटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत मंगळवारी कोविड-१९ ५६ बाधित रुग्ण आढळून आले. ही आढळून आलेली संख्या एका दिवसापूर्वीच्या संख्येच्या तुलनेत तिप्पट वाढली असल्याचे मुंबई मनपा वैद्यकीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.