दिल्ली : रुपयाने आतापर्यंतची सर्वात मोठी नीचांकी गाठलेली आहे. रुपया हा पहिल्यांदाच प्रति डॉलर च्या तुलनेत 80.3 रुपये इतका झाला होता. ही आतापर्यंत ची सर्वात मोठी नीचांकी आहे. रुपयांचे मूल्य जेव्हा डॉलरच्या प्रमाणात घसरते तेव्हा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसतो, देशाची अर्थव्यवस्था आणखीनच खालावते. आज रुपया प्रति डॉलर 80 रुपयांच्या खाली गेल्याने चलन व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. यासह, रुपया या वर्षी 7 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे.
रुपयाने सुरवातीला ८०.०१ रुपये प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता, तर काल तो ७९.९७ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. आज रुपया प्रति डॉलर 80.05 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दिवसेंदिवस रुपया डॉलर च्या तुलनेत अधिकच कमकुवत होताना दिसतो आहे.
रुपयाचे मूल्य दिवसेदिवस इतके घसरण का होत आहे?
तज्ञाच्या मते, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत नुकतीच झालेली वाढ आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे भारतीय चलनावर येत असलेला दबाव अश्या अनेक गोष्टींमुळे भारतीय चलन रुपया हे दिवसेंदिवस घसरत चालाले आहे.
रुपयाच्या घसरणीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल संसदेत स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्यातेलात वाढ आणि जागतिक आर्थिक स्थिती यासर्व कारणांमुळे रुपया डॉलर च्या तुलनेत घसरत आहे.