FIFA WORLD CUP 2022 : फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये समोर आलेल्या नोरा फतेहीच्या एका व्हिडिओने नोराच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये फिफा फॅनफेस्टमध्ये बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने स्टेजवर धमाकेदार डान्स केला. मात्र, तिरंग्याचा अपमान केल्या प्रकरणी नोरावर टीका होत आहेत. तिच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
फिफा माध्ये धमाकेदार डान्स झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण नोरावर टीका करताना दिसत आहे. तिरंग्याचा अपमान केल्या प्रकरणी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर नोरा आलीये. नेटकरी या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून नोरावर टीका करत आहेत. आता हे प्रकरण इतके जास्त वाढले आहे की, अनेकजण नोरावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हिडिओची लिंक :
https://www.instagram.com/reel/CljduQ9h5lP/?igshid=MDJmNzVkMjY=
नोराने फिफा फॅनफेस्टमध्ये ‘ओ साकी साकी’ आणि ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर डान्स केला. जेंव्हा नोराचा डान्स झाला त्यावेळी एका चाहत्यांने तिला भारताचा तिरंगा दिला. मात्र, यावेळी नोराने एखाद्या ओढणीसारखा तिरंग्याचा वापर केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. असं करून तिने देशाचा मान असणाऱ्या तिरंग्याचा अपमान केला असं देखील म्हंटल जात आहे. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा ज्यावेळी नोराच्या हातामध्ये आला. त्यावेळी तिने तो उलटा धरून फडकावला. तिरंग्याचा सन्मान न करता रूमालासारखा तिने हातामध्ये तिरंगा पकडला. हे पाहून नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढला आहे.
यामुळे नोरा फतेही चांगलीच ट्रोल होत आहे. फिफा विश्वचषक २०२२ फॅन फेस्टिव्हलमध्ये तिरंगा चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा, फडकवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप नोरावर करण्यात येत आहे. सर्वप्रथम नोराला स्टेजवर फेकून तिरंगा देण्यात आला. तेव्हा नोराने तो धरून देशाचा तिरंगा नसून स्कार्फ असल्यासारखे हलवले असे आरोप केले जात आहेत.
फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये देशातील अनेक कलाकार झळकले आहे. जगातील सुप्रसिध्द गायक, डान्सर सगळ्यांनी हजेरी लावत आपली कलाकारी दाखवत फिफा ला ‘चार चांद’ लावले. त्याचप्रमाणे नोराने देखील शानदार पफोर्मंस दिला. मात्र या व्हिडिओमुळे ती वादात सापडली आहे.