ही धमकी आहे का..? ‘जेल’च्या वक्तव्यांवरून राऊतांचा सवाल

Maharashtra Political News : राज्यात एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्न (Maharashtra and Karnataka border issue) पेटला आहे. तर दुसरीकडे राजकारणात (Maharashtra Politics) एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावरून संजय राऊत राज्य सरकारला धारेवर धरत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नावर मूग गिळून बसले आहे. ते षंढ, नामर्द आहे, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. त्यांच्या या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Shambhuraj Desai, BJP leader Chandrasekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तरावर संजय राऊत यांनी ट्वीट च्या माध्यमातून सवाल केला आहे.

संजय राऊतांच ट्वीट

‘शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj)अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा. न्यायालये. तपासयंत्रणा खिशात आहेत. असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे.!!’ – संजय राऊत

खर तर, संजय राऊत यांच्या सरकारवरील टीकेला उत्तर देताना ‘संजय राऊत यांनी तोंड आवरावं. साडे तीन महिले आराम करून आल्यामुळे त्यांना बाहेरचं वातावरण सूट होत नाहीये, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं. राऊतांच्या याच टीकेवर ट्वीट वारंवार करत ‘सरकारवर टीका करणाऱ्या राऊत यांनी जेलमध्येच ही भाषा शिकली. षंढ, मर्दानगी हे शब्द तिथूनच शिकून आल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलं. या दोघांच्या उत्तरला संजय राऊत यांनी ट्वीट करून सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये शंभूराज देसाईंना उद्देशून ‘मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ… असं लिहिलंय. महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border issue) सत्य बोलणारे, प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा… ही सरळ सरळ धमकी समजायची का, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही चांगलच पेटल्याचे दिसून येत आहे.