Home » मीठ जास्त पडले ही त्याची चूक! मालकाने केली निर्घृण हत्या

मीठ जास्त पडले ही त्याची चूक! मालकाने केली निर्घृण हत्या

by नाशिक तक
0 comment

पिंपरी चिंचवड : राज्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून शुल्लक कारणांवरून हत्या घडवल्या जात असून पिंपरी चिंचवडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेवनात मीठ जास्त पडले, ह्या किरकोळ कारणावरून ढाबा मालकाने आपल्या आचाऱ्याचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना शहरातील शेल पिंपळगावात घडली आहे. प्रेसनजीत गोराई (वय 35) असे मृताचे नाव आहे. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी झाली असून घटनेचा आता खुलासा झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेसनजीत गोराई हा मुळ राहणार पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तो शेल पिंपळगाव येथील ओंकार ढाबा या ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. दरम्यान, 26 ऑक्टोबर 2022 ला ढाब्यात स्वयंपाक करत असताना त्याच्याकडून चुकून जेवनात मीठ जास्त पडले. यावरून ढाबा चालक यांना राग अनावर झाला. ढाबाचालक ओमकार अण्णाराव केंद्रे आणि कैलास अण्णाराव केंद्रे यांनी प्रेसनजीत गोराई याला लोखंडी पाईप, लोखंडी रॉड आणि वायरणे बेदम मारहाण केली व त्याचा खून केला.

यानंतर दोघा आरोपींनी आपल्या आचारी गोराई याचा मृतदेह ढाब्यातच लपवून ठेवला व दोन दिवसानंतर त्याला नजीकच खड्डा खोदून त्यात पुरून टाकले. मात्र या कृतीचा सुगावा पोलिसांच्या खबऱ्याला लागला. त्यानंतर दोन महिन्यांनी याप्रकरणाचा खुलासा झाला आहे. ढाबाचालक ओमकार अण्णाराव केंद्रे आणि कैलास अण्णाराव केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!