तो व्हायरल फोटो एकनाथ शिंदेंचा नाही तर ‘या’ व्यक्तीचा आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ‘रिक्षाचालकाचा फोटो’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तरुण वयाचा फोटो समजून तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो इतका व्हायरल होत आहे की याची दखल अनेक नेत्यांनी घेतली. कोणी म्हणत हा एकनाथ शिंदेचा फोटो आहे. तर कोणी म्हणत हा फोटो एकनाथ शिंदेचा नाही, मात्र एका वेबसाईटने या फोटोचा पाठपुरावा करून हा फोटो एकनाथ शिंदेचा नाही हे शोधून काढले आहे. तर हा फोटो महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असून ते पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी आहेत.

श्रावण महिना हा अतिशय पवित्र असतो या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पूजाअर्चा असतात या काळात रिक्षाचालकही वर्गणी काढून एका सोमवारी मंडप उभारून पूजा घालतात. महाराष्ट्रात ही प्रथा आजही आहे. यादिवशी सर्व चालक आपापल्या रिक्षा स्वच्छ धुवून आणि विशेष सजावट करून आणतात व त्या ठिकाणी सामुहिक पूजा होते. हा फोटो त्यावेळचा म्हणजे १९९७ मधील श्रावण महिन्यामध्ये रातराणी रिक्षा थांब्यासमोर बाबा कांबळे यांचे स्वतःच्या रिक्षा सोबतचा आहे. आणि ह्या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे समजून सोशल मीडियावर रविवार पासून फिरू लागला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरुण वयात रिक्षाचालक होते आणि त्यांना दाढी ठेवण्याची आवड होती, फोटोमध्ये दिसणारे बाबा कांबळे यांनीही दाढी ठेवली होती, त्यात दोघांच्याही चेहऱ्यात काही प्रमाणात साम्य आहे. त्यामुळे बाबा कांबळे यांचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समजून भन्नाट व्हायरल झाला. आणि तो फोटो बाबा कांबळे यांच्यापर्यंत देखील पोहोचला, मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा फोटो पाहून ते चकित झाले. मात्र लोकांच्या मजेशीर कमेंट वाचून त्यांनीही या गोष्टीतून आनंद घेतला.