नाशिक :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली साराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे नाशिक शहरातील जिल्हासत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला भेट देणार आहेत. रविवारी उपोषणाचा अकरावा दिवस होता. जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वरीद्वारे संपर्क करून आपण नाशिकला येणार असल्याचे कळविले. रविवारी अनेकांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांचे मनोबल उंचावले या आंदोलनात नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, कैलास बहाले, राम खुर्दळ, योगेश पाटील, राम निकम, नितीन रोटे, संजय पडोळ, विकास देशमुख, संदीप कुठे, योगेश कापसे, राम गहिरे, भास्कर पाटील, महेंद्र बेहेरे, पवन पवार, अनिल गायकवाड यांचे साखळी उपोषण सुरू आहे. नगरसेवक अरुण पवार महेंद्र बडवे दिलीप मोरे शिरीष जोंधळे गंगाधर निखाडे डॉ. प्रशांत पिंगळे नितीन जिवडे, मनोज चव्हाण,बापू चव्हाण यांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून भेट दिली आहे. (nashik maratha protest)
मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू आसलेला आंदोलनाचा लढा अद्यापही कायम सुरू आहे. आंतरवली साराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समजाला आरक्षण मिळाव यासाठी उपोषण करत आहे. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवली सराटी येथे प्रत्यक्ष मनोज जरांगे यांची भेट घेऊन सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यासरकार सकारात्मक आहे. लवकरच मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु जोपर्यंत मराठा समजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही. तसेच साखळी उपोषण सुरू राहील आस मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले होते.
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही त्यामुळे कोर्टातूनच आरक्षण द्याव लागेल त्यासाठी सरकारला कालावधी ४० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील ठिकठिकाणी सुरू आसलेल्या आंदोलण स्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन करणार आहे. नाशिक येथे सकल मराठा समाजाकडून सुरू आसलेल्या आंदोलनाला लवकरच भेट देणार आसल्याच भ्रमाणध्वनीद्वारे उपोषणकर्त्यांनी बोलतांना सांगितल आहे. तेव्हा आता मनोज जरांगे पाटील नाशकात येऊन काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.