गर्लफ्रेंडला न्याय मिळावा यासाठी त्याची मंत्रालयाच्या ५ मजल्यावरून उडी

आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला होता. या आत्महत्येच्या प्रयत्नाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. प्रीयासीवर बलात्कार झाला व तिने त्यानंतर आत्महत्या केली, तिला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे तीन वर्षांपासून उंबरठे झिजवले मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

बापू नारायण मोकाशी (वय 43) असे या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे. बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. 

त्याने बापू मोकाशी यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर पडला. तरुणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ सुरक्षा जाळी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पडल्यानंतरही बापू मोकाशी काही वेळ तिथेच पडून होता. त्याने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते सुरक्षा जाळीवरून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही वेळ पोलिसांनी त्याची विचारपूस केली आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे. 

सुदैवाने तो जाळीवर पडल्याने त्याला फारशी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की आता तरी त्याच्या मागण्यांची दखल प्रशासन घेईल की नाही हा प्रश्न आहे.