Home » कर्नाटकचा जत, सोलापूर-अक्कलकोटवर दावा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळें ठणकावले

कर्नाटकचा जत, सोलापूर-अक्कलकोटवर दावा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळें ठणकावले

by नाशिक तक
0 comment

जतसह सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वातावरण ढवळून टाकले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता त्यांना घरचा आहेर भेटला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना चांगलेच ठणकावले असून महाराष्ट्रातील टाचणी भरही जमीन जाऊ देणार नाही असे बावनकुळे यांनी ठासून सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातील सातार्याच्य जत तालुक्यातल्या 40 गावांवर दावा केला होता. तो वाद शमतो न शमतो तोच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे.

“कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे” असे बोम्माई यांनी बोलून महाराष्ट्रातील वातावरणात खळबळ उडवून दिली आहे.

आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोम्मई यांनी त्यांना चांगलेच ठणकावत सांगितले की, “महाराष्ट्रातील टाचणी भरही जमीन जाऊ देणार नाही”.

कर्नाटकातही अनेक जण मराठी बोलतात. एक टाचणीही जमीन कर्नाटकात जाणार नाही. महाराष्ट्र सरकार मजबूत आहे, आम्ही टाचणीभरही जमीन देणार नाही असे बावनकुळेंनी बोम्मईंना ठणकावून सांगितले आहे.

सीमावाद प्रश्न हा अधिकच बिकट होत चालाल असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची देखील तयारी दर्शवली असून एक गावही कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!