नाशिकच्या ‘या ‘ व्यक्ती मुळे उजळणार काश्मीर खोरं

नाशिक | नाशिकच्या सुरेश कापडिया (Suresh Kapdiya ) यांच्या पवन ऊर्जाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना फायदा होणार आहे

जम्मू काश्मीर (Jamu kashmiir) मध्ये पहिल्यांदाच पवन ऊर्जा (pavan urja )च्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जाणार आहे हा प्रथमच प्रयोग असून याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या फायदा होणार आहे. नाशिकच्या सुरेश कपाडिया यांच्या पुढाकाराने भारताच्या सीमारेषेवरील भागात हा प्रकल्प राबवण्यात येत आहे . त्या ठिकाणहून अगदी हाकेच्या अंतरावर पाकिस्तान (Pakisathan ) असलेल्या ठिकाणी हा पवन ऊर्जा प्रकल्प राबविला जात आहे. या पवन ऊर्जे मुळे सीमावर्तीय भागात असलेल्या गावांना आता 24 तास लाईट (lite) उपलब्ध होणार आहे.

काश्मीर खोऱ्यातील लाईट नसलेल्या बहुतांश भागातील लोकांना (people ) या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे दिलासा मिळणार आहे . सध्या स्थितीला तेथील लोकांसाठी दिवसभरात फक्त २ ते ३ तास (Hors) विद्युत पुरवठा केला जातो.त्यामुळे तेथील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पवन ऊर्जा प्रकल्पामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बराचसा फायदा होणार आहे आर्मीच्या शेवटच्या चेक पोस्ट पर्यंत पवन ऊर्जाच्यया माध्यमातून विद्युत पुरवठा (Power supply) केला जाणार आहे .

त्यामुळे त्या ठिकाणी देखील विद्यूत पूवरवठ्या अभावी येणाऱ्या अनेक अडचणी दूर होणार आहेत. दरम्यान तेथील छोट्या-मोठ्या गावांसह सीमा (bordar ) सुरक्षेच्या बाबतीत या पवन ऊर्जाचा येत्या काळात फायदा होणार आहे हे तर नक्कीच आहे .परंतु त्याबरोबरच तेथील नागरिकांना लाईट उपलब्ध झाल्याने उत्पनाचे अनेक मार्ग देखील उपलब्ध होऊन आर्थिक फायदा होऊ शकणार आहे. या उपलब्ध होणाऱ्या विद्युत पुरवठ्या मुळे पर्यटनाला हि चालना मिळणार आहे. त्या ठिकाणी सध्या विद्युत पुरवठा हा डिझेल (Dizl) च्या माध्यमातून जनरेटरवर उपलब्ध केला जात आहे.

आणि त्या साठी वर्षागणिक सुमारे हजारो लिटर डिझेलचा वापर केला जात आहे. पवन ऊर्जा मुळे तेथील नागरिकांना वर्षाला लागणारे हजारो लिटर डिझेल वाचणार आहे. सौर ऊर्जेच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी विद्युत पुरवठा उपलब्ध करायला अडचण निर्माण होत असल्याने आणि त्या ठिकाणी हवा खेळती असल्याने पवन ऊर्जाच्या माध्यमांतून लाईट हि योग्य पद्धतीने मिळणार आहे. वर्षातील सुमारे आठ महिने त्याठिकाणी बर्फ असल्याने सौर उर्जेला अडचणी उपलब्ध होत असतात