Home » ‘क्या से क्या हो गया’.. हे उर्फिला काय झालं..?

‘क्या से क्या हो गया’.. हे उर्फिला काय झालं..?

by नाशिक तक
0 comment

मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदला हे काय झालं आहे..? असंच प्रश्न तिचे समाज माध्यमावर शेअर केलेले फोटो पाहून वाटत असेल. तिला कोणी मारलं आहे की काय असंचं फोटो पाहून वाटत आहे. इतरांना काय तर तिला स्वतःलाही असं वाटतय की तिला कोणी तरी मारलं आहे की काय. मात्र हा सर्व प्रकार एलर्जीचा आहे.

नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असलेल्या उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहे. यात तिने तिच्या डोळ्याखाली काहीतरी झालं आहे आणि तिचा चेहरा देखील सुजलेला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. ती म्हणते आहे की, ‘असं वाटत आहे की, मला कोणीतरी खूप जोरात मारलं आहे.’

उर्फीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. उर्फीनं तिचा हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. उर्फिने टाकलेल्या या फोटो वरून खरंच तिला कोणीतरी डोळ्यावर जोरात मारलं असावं असं वाटत आहे. मात्र उर्फिने स्वतः चं याबद्दल माहिती दिली आहे.

उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?’ त्यात ती माहिती देताना म्हणते ‘मझ्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स झाले होते. अंडर आय क्रिम हा एक स्कॅम आहे. अशी कोणतीच अंडर आय क्रिम नाहीये, जी तुमचे डार्क सर्कल्स कमी करेल. त्यासाठी आय फिलर्स हाच एक चांगला ऑप्शन आहे.’ असं तीई म्हणाली. मात्र तिच्या या फोटोंची चर्चा आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!