नाशिक : रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांना हेरुन त्यांच्या पर्समधील दागिने चाेरुन नेणाऱ्या दाेन महिलांना मुंबई नाका पाेलिसांना अटक केली असून रिक्षा प्रवासात चोरीचे दोन गुन्हे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवास आणि सिटी बस प्रवासाच्या दरम्यान चोरीच्या घटना समोर आल्या होत्या.चोरांना पकडण्याच मोठा आव्हान पोलिसांसमोर होत,मुंबई नाका पोलिस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोन महिला बस स्टँड वर उभ्या असल्याचे दिसून आले ,त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली संशय बळावल्याने पोलिसांनी त्या दोन्ही संशयित महिलाना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.या महिलांसोबत एक ४ वर्षाचा मुलगा देखील होता.मुंबई नाका पोलीसांच्या हद्दीत रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागदागिने व राेकड चाेरुन नेल्याच्या दाेन घटना घडल्या हाेत्या.या दोन घटनेत प्राजक्ता वैभव सोनजे व भारती गांगुर्डे यांनी तक्रार दिली हाेती.
या तक्रारदार महिला प्राजक्ता सोनजे व भारती गांगुर्डे यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात बोलावून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिला व त्यांचा लहान मुलगा दाखविला असता तेव्हा दोन्ही महिलांनी संशयित महिलांना व मुलाला आेळखले ,त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे दोन गुन्हे देखील पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत आहिरे यांच्याकडून देण्यात आली आहे.ताब्यात घेतलेल्या दोघं महिलांकडून आणखी काही गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना असून या बाबत अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहे…