घरफोडीत लाखो रुपये व दागिने लंपास.

नाशिक : जयभवानी रोड येथे घरफोडीमध्ये तब्बल सोन्या चांदीचे दागिने भांडे आणि रोख रक्कम असा एकूण १३ लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.


उपनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती आणि सोहनलाल शर्मा यांच्या फिर्यादीनुसार,भाग्य पॅलेस ,औटे मळा,जयभवानी रोड,नाशिक रोड येथे एका अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून तसेच बेडच्या कप्प्यात ठेवलेले ३,६०,००० रुपये किमतीचे १८० ग्रॅम वजनाचे १२ सोन्याच्या बांगड्या,६४,००० रुपये किमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे ४ हिरे असलेल्या सोन्याच्या अंगठ्या,७०,००० रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट ३६,००० रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे २ सोन्याची चैन,१,००,००० रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे ४ जोड सोन्याचे कानातील झुमके,८०,००० रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे ३ हिरे असलेले सोन्याचे मंगळसूत्र,

२० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या पेंडल,३२,००० रुपये किंमत १६ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कॉईन,८,००० रुपये किंमत ४ ग्रॅम वजनाचे १ सोन्याची नथ,१,८०,००० रुपये किंमत असलेले चांदीचे भांडे,१,१३,००० रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनाचे १० जोडी चांदीचे पायल,१२,००० रुपये किंमतीचे ४०० ग्रॅम वजनाचे २ चांदीचे कॉईन ,३०० रुपयांचें १० ग्रॅम वजनाचे १ चांदीची चैन,३०० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट आणि ३,४०,००० रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क.४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ,उपनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.