सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाटात रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यावर रहदारी बंद झाल्यामुळे राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा आणि गुजरात मधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यातील पार नदीवर असणाऱ्या उंबुरणे-बेजावड पुलावरून पाणी गेल्याने पेठ तालुक्यातील झरी, अंबास, सावरणा कुंभाळे, खिर्डी उंबरने, भाटी, भेनशेत आदी गावांचा संपर्क तुटला आहे.
सुरगाणा तालुक्यात पावसाची जोरदार फायरिंग चालू असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे सुरगाणा तालुक्यातील ननाशी बाऱ्हेच्या हस्ते घाटात दरड कोसळली असून माती खचून पूर्णपणे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा मार्ग देखील बंद झाला आहे. नानाशी येथून नाशिक जाताना बाऱ्हे, ठाणगाव अंभोरे, गडगा आदी भागातील संपर्क तुटला आहे. सुरगाणा-बाऱ्हे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दांडीची बारी, म्हसमाळ, शिरीषपाडा आदी गावाचा संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील गुरटेंभी येथे एक घर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जून महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील बोरगाव, सुरगाणा, राहुडे, पायरपाडा, जीवा आणि खोबळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरगाव परीसरातील नदी नाल्याने पुलाच्या वरून पाणी वाहून जात असल्याने दळनवळनाची साधणे बंद झाली आहेत. अशात सापुतारा, चिखली, चिराई घाटात देखील दरड कोसळेल असी परिस्थिती निर्माण झाली आहे.