By चैतन्य गायकवाड |
नवी दिल्ली : देशात नवीन कोरोना रुग्णांच्या (new corona patients in country) संख्येत गेल्या २४ तासांत मोठी वाढ झाली आहे. काल (शुक्रवारी) दिवसभरात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल १५ हजार ९४० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ४ महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, गुरुवारी (दि. २३ जून) देशभरात आढळून आलेल्या नवीन कोरोना बाधितांच्या तुलनेत कालच्या कोरोना बाधितांची संख्या कमी आहे. गुरुवारी देशभरात तब्बल १७ हजार ३३६ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. या वेगाने वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या ९० हजारांच्या पार गेली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९१ हजार ७७९ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत १२ हजार ४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter account) ही माहिती दिली आहे.
सध्या देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या बघता, देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची चौथी लाट जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. ही लाट ऑक्टोबरपर्यंत राहील, असा त्यांचा अंदाज आहे. देशातील पॉझिटिव्हिटी रेट ४.३९ टक्क्यांवर पोहचला आहे. देशातील पाच राज्यांत संसर्गाचा दर सुमारे ८ टक्क्यांहून जास्त आहे. देशात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सध्या आढळत असलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या १०० दिवसांतील सर्वाधिक संख्या आहे.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर ०.२१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत देशात 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत एकूण ५ लाख २४ हजार ९७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील रिकव्हरी रेट ९८.५८ टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत एकूण ४ कोटी २७ लाख ६१ हजार ४८१ कोरोना बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ६३ हजार १०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
कोरोना संसर्गाच्या समस्येला जगातील अनेक देश अजूनही संघर्ष करत आहेत. भारतात आता संसर्ग वेगाने वाढू लागल्याचे दिसते. देशात कोरोनाची चौथी लाट जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. ती ऑक्टोबरपर्यंत राहू शकतो. त्याचा पीक ऑगस्टच्या आसपास राहू शकतो. देशात गेल्या १०० दिवसांत सर्वाधिक १७ हजार ३३६ नवे रुग्ण आढळले. संसर्ग दर वाढून ४.३२ टक्क्यांवर गेला आहे. देशातील पाच राज्यांत संसर्गाचा दर सुमारे ८ टक्क्यांहून जास्त आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ८६ हजार ८६५ झाली आहे. चार महिन्यातील ही सर्वात मोठी उसळी आहे. कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या वाढून ५ लाख २४ हजार ९५४ झाली आहे. चोवीस तासांत देशभरात १३ हजार २९ रुग्ण बरे झाले. देशात ८५.९८ कोटी तपासण्या झाल्या.