लोकसभा निवडणूक! प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच भाकीत की बडबड? पवारांचा..

निवडणुका लांबणीवर आहेत मात्र भाजप त्याचा अभ्यास नेहेमी आधीच करून ठेवते, त्याच आधारे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक भाकीत केले आहे. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीविषयी महत्वाचे विधान केले आहे. २०२४ ची निवडणूकही भाजप एकहाती जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ४०० पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. तर महाराष्ट्रात ४५ जागा आमच्याकडे असतील असे भाकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे २०१९ प्रमाणेच मोदींची जादू चालणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बारामतीचा गड उद्धवस्त करणार!

देशात अनेकजण निवडणुका 40-40 वर्षे जिंकले. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार!, असा आत्मविश्वास बावनकुळेंनी दाखवला. आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल तसेच आम्हाला संघटन मजबूत करायचे असून विकासकामे पुढे न्यायची आहेत.

जनतेला आतापर्यंत जे मिळाले नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. चांगल्या लोकांना पक्षात आणायचे असून संघटना मजबूत करुन 2014 ची लढाई करायचीय, असे बावनकुळे म्हणाले. सध्या बारामतीत फिरतोय. लोकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळतोय. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढतेय. पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघात दौरे करणार आहे. 18 महिन्यांसाठी निर्मला सितारमण यांची बारामती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे अनेक दौरे होतील. संघटन, गरीब कल्याणाच्या योजना पोहोचवणे यावर भर असेल, असे बावनकुळे म्हणालेत.

यंदा लोकसभा रंगणार

२०१९ लोकसभा एकहाती नरेंद्र मोदी यांनी खेचून आणली सोबतच स्वबळावर सरकार स्थापन होईल इतके बहुमत त्यांनी स्वतःच्या पक्षाचेच निर्माण केले. मात्र यंदा विरोधकही चांगलेच एकजूट झाले असून त्यांनी देखील दंड थोपून निवडणुकांसाठी तयार आहेत. भाजपचा कट्टर विरोधक काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा करत आहेत. नक्कीच याचा आगामी लोकसभेत विरोधकांना फायदा होणारच आहे. भाजपच्या विरोधात कॉंग्रेसला पर्याय बनू पाहणारा आम आदमी पक्षाची ताकद देखील वाढत असून आप देखील पूर्ण ताकदीनिशी लोकसभेत उतरणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा २०१९ सारखी आकलनीय नसून नक्कीच अनाकलनीय राहणार आहे. मागील ४ ते ५ दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेले पवार कुटुंबियांचा गड भाजप निर्मला सीतारमण यांच्या सहाय्याने जिंकणार का, अमेठी पटर्न बारामतीत चालणार का? अश्या अनेक बाजूंनी ही निवडणूक रंगणार आहे.