Home » अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान; भुजबळांचे सरकारला भावनिक आवाहन

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान; भुजबळांचे सरकारला भावनिक आवाहन

by नाशिक तक
0 comment

काल सटाणा भागात पाऊस झाला. शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, गहू, हरभरा पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. बिचाऱ्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय ? अश्या परिस्थितीत फक्त सरकार मदत करू शकते. १० लाख कोटी रुपये उद्योगपतींना जर सरकार माफ करतात, तर या शेतकऱ्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. पहिले महत्व शेतकऱ्यांना दिले पाहिजे. पीक विमावाले काहीही मदत करत नाही. शब्दचल करून शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देत नाही. ताबडतोब पंचनामे केले पाहिजे. सरकारकडे माहिती कलेक्टरकडून पुरवली गेली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आयुष्याची होळी व्हायला आली आहे.

बकेश्वर तालुक्यात बरड्याची वाडी येथील एक महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे महिलेसोबत आलेल्या तिच्या आईलाच तिची प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक बाब घडली आहे. याबाबत आपण कलेक्टर सोबत बोलनार असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच फक्त मुंबई मध्ये सरकारी दवाखाना काढून चालणार नाही. इकडे पण दवाखाने आहेत, पण डॉक्टर नाही, औषध नाही, असा टोला त्यांनी लगावला.

नाफेड अजूनही मार्केट मध्ये खरेदीला उतरत नाही. प्रत्येक कांद्याचे ट्रॅक्टर येईल, त्यावर बोली लावा. त्यामुळे त्यावर तेथील व्यापारी आणखी मोठी बोली लावेल. कांदा खरेदी बाबत चुकीची माहिती सरकारला पुरवली जातेय असे देखील भुजबळ यावेळी म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात सुरु असलेल्या उपोषणावरून आता राजकीय वातावरण अधिकच पेटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरून प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. त्यावर बोलताना, ‘संजय शिरसाठ काय बोलतील, काय सांगता येत नाही. ही मोठी मंडळी आहे’ असे भुजबळ म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं बाळासाहेबांच्या कुटुंबियांना शोभण्यासारखं नाही, अशी खोचक टीका दीपक केसरकर यांनी केली. त्यावर भुजबळ म्हणाले की, त्यांनी यापूर्वी दोन वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतच सरकार चालवले होते. बाळासाहेबांनी एकदा पूर्ण काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी एकही उममेद्वार दिला नव्हता. केसरकर अगोदर राष्ट्रवादीत होते. मग शिवसेनेत गेले, त्यामुळे त्यांना हे सर्व माहित नसावे. उद्धव ठाकरे यांची सभा पाहिल्या नंतर लक्षात येईल, किती मोठी प्रचंड सभा होती.. हवा भाजप सरकारच्या विरोधात सुरू आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!