प्रेम करणं महागात पडलं ? तरुणाला अमानुषपणे मारहाण करत..

नांदेड : शहरात प्रेमप्रकरणाच्या संशयावरून एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात (A youth was brutally beaten up in the city on suspicion of having a love affair) आली आहे. फक्त संशयावरून टोळक्याने तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात (A young man was brutally beaten to death) आली आणि त्याची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या माळटेकडी (Nanded, Maltekdi) परिसरातील एका तरुणाचे त्याच्या घरासमोरील महिलेशी प्रेम संबंध होते. त्यातून या युवकाचे एका टोळक्याकडून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि यात त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार प्रेमसंबंधाच्या संशयावरून घडल्याचे कळत आहे. दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने या तरुणाची अपहरण करून हत्या केली होती. स्वप्नील नागेश्वर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या टोळक्याने आधी स्वप्नीलचे अपहरण करून त्याला आणि संबंधित महिलेला नांदेड शहरात असलेल्या उर्वशी मंदिराजवळील (Urvashi Temple, Nanded) जागेत नेण्यात आले.  त्याठिकाणी स्वप्नील नागेश्वरला संबंधित टोळक्याने बेदम  मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर थरारक हत्याकांडाचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला होता.

या हत्याकांडातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी सदर सीसीटीव्ही फुटेजची मदत झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. घरासमोरील महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार या सात संशयितांपैकी एकही मारेकरी हा सदर महिलेचा नातेवाईक नाही. ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘आपल्या समाजातील महिलेशी स्वप्नील बोलत असल्याने सदर समाजातील काहींनी स्वप्नीलची हत्या केली आहे’ असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबाने केला आहे.

एकही संशयित आरोपीचा महिलेशी नातेसंबंध नव्हता

सदर घटनेत स्वप्नीलचे सदर तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ऑटोतून अपहरण करण्यात आले होते. ज्यात अटकेत असणाऱ्या सात आरोपींपैकी एकही आरोपी सदर महिलेचा नातेवाईक नाही. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली होती. त्यातील सात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे संपूर्ण नांदेड शहर हादरून गेले आहे.