Home » महाराष्ट्रातील गाड्या कर्नाटकात फोडल्या! फडणवीसांचा बोम्माईंना फोन..

महाराष्ट्रातील गाड्या कर्नाटकात फोडल्या! फडणवीसांचा बोम्माईंना फोन..

by नाशिक तक
0 comment

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून बेळगावात हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे सीमावाद आणखी भडकला असून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सहा ट्रकवर या संघटनांकडून दगडफेक करण्यात आली असून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करून निषेध व्यक्त केला आहे. तसेच आता राज्यात देखील वातावरण तापले असून पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी ट्रकवर चढून झेंडे मिरवले, जोरदार घोषणाबाजी देखील केली. यामुळे आता कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळला असून यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन केला. यावेळी या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, आज राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर आज कन्नड संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर आज आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. मात्र तरीही इथले वातावरण भडकले असून कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!