नाशिक | प्रतिनिधी
अखेर तब्बल दोन वर्षांच्या कलखंडानंतर राज्यातून सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी सण उत्साहात साजरे करावेत असे आवाहन ही करण्यात आले आहे.
राज्य सरकारने (Maharashtra) कोरोना निर्बंध (Corona Restrictions Removed) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२० मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत.
तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंध एकमतानं उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण असून तब्बल दोन वर्षानंतर घराचे कवाडे पूर्ण क्षमतेने उघडणार आहेत.