नाशिक । प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) १८ मंत्र्यांनी कोरोना काळात (Corona Crisis) खासगी रुग्णालयात उपचार (Private Hospital Treatment) घेऊन लाखोंची बिलं सरकारी तिजोरीतून भरल्याची प्राथमिक माहिती आहे. जनता कोरोना संकटात असताना, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत असताना १८ मंत्र्यांनी मात्र, ०२ वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेत तब्बल १ कोटींचा खर्च केल्याचे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले आहे.
कोरोनाच्या काळामध्ये (Corona Virus) महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामधील अनेक नेत्यांनी खासगी रुग्णालयामध्ये (Private Hospital) उपचार घेतले आणि ते बरे सुद्धा झाले. या नेत्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले खरे पण त्यांनी या उपचारासाठी आलेले लाखो रुपयांचे बिल सरकारी तिजोरीमधून (Government Treasury) दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान या मंत्र्यांची यादीच समोर आली असून यामध्ये सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादीचे (NCP) आहेत. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी काँग्रेसच्या ०६ आणि शिवसेनेच्या ०३ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीतून पैसे खर्च केले आहेत. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या (Health Minister Rajesh Tope) उपचारासाठी तब्बल ३४ लाखांचे बिल झाले आहे. त्यामुळे या मंत्र्यांना सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का असाच सवाल विचारला जात आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये राज्यातील सामान्य नागरिक बेड मिळत नसल्यामुळे त्रस्त होते. बेड मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सरकारी वैद्यकीय सेवेची आबाळ असतांना मंत्र्यांना मात्र खाजगीत उपचार करून अवाढव्य खर्च करून जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार घडला आहे. या यादीत राजेश टोपे यांच्यासह नितीन राऊत, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांचा समावेश आहे.