मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या भाषणावर आजच कारवाई होणार!


मुंबई | प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भाषणावर कारवाई होणार की नाही याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राज यांच्या भाषणावर कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish Sheth) यांनी दिली आहे.

औरंगाबाद (Aurangabad) च्या सभा घेण्यासाठी राज ठाकरे यांना भाषणासंदर्भात पोलिसांकडून (Aurangabad Police) अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सदर भाषणाचा अभ्यास करून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती रजनशी शेठ यांनी दिली आहे.

दरम्यान औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबतचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे आजच राज यांच्या भाषणावर कारवाई होईल, असे रजनीश शेठ यांनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंना नोटीस दिली की नाही मला माहीत नाही. तो विषय पोलीस आयुक्तांकडे आहे, असंही त्यांनी सांगितले.

तसेच औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात (Aurangabad City Police Station) गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून कायदा हातात घेऊ नका अन्यथा कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर मनसे (MNS) अद्याप ठाम असल्याने पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. आम्ही संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. अनेकांची धरपकड केली आहे. तर सुमारे १३ हजार लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राख ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. राज्यात अनुचित प्रकार घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही रजनीश शेठ यांनी दिला आहे.