औरंगाबाद सभेआधी राज ठाकरे ‘या’ शहरांत धडकणार!

नाशिक । प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. गुढीपाडवा मेळाव्यापासून (Gudhipadwa Melava) ते आता संभाजीनगर असा त्यांचा सध्याचा सभांचा प्रवास सुरु आहे. यातलाच एक भाग म्हणून राज ठाकरे दि. २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी औरंगाबाद (Aurangabad) सभेवरून चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. अद्याप या सभेला परवानगी नसल्याचे समजते. त्यामुळे या सभेबाबत अद्यापही सांशकता आहे. मात्र राज ठाकरे पुण्यातून थेट औरंगाबादच्या सभेला रवाना होणार आहेत. पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पुणे शहर (MNS Pune) कोअर कमिटीची बैठक आज पार पडली.

दरम्यान सदर बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात असणाऱ्या राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही (Ayodhya Tour) बैठकीत चर्चा झाली. तसेच ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंची तोफ संपूर्ण महाराष्ट्रासह अयोध्येत धडकणार आहे.

विशेष म्हणजे ठाण्याच्या सभेनंतर मनसे इंजिन पुन्हा एकदा ट्रॅकवर आल्याचे दिसून येते आहे. आगामी विविध सभांमधून राज ठाकरे हे चांगलेच आगपाखड करणार असल्याचे दिसते. पुणे येथील सभेच्या पार्श्वभूमीवर तसेच महाआरती साठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु असून आज मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.