नाशिक । प्रतिनिधी
अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून सुप्रीम कोर्टाने यावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकांचा बिगुल पुन्हा एकदा वाजणारा असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आज सर्वोच्च न्यायालयातमहत्वपूर्ण सुनावणी होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने एका आठवड्यात निवडणुकांच्या तारखा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूरसह राज्यातील १८ महापालिकांमध्ये निवडणुका होतील अशी आशा दिसू लागली आहे.
दरम्यान आज ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला असून यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. सुप्रीम कोर्टाने एका आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असे सांगितले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून आता एका आठवड्यात काय आणि कसे नियोजन होईल हे येणाऱ्या काळात लक्षात येईल.