त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची धूम; भाविकांची प्रचंड गर्दी

नाशिक : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी आज सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या त्रंबकेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरातून भाविक आल्याने प्रत्येकांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले आहे.

आज (१८ फेब्रुवारी) महाशिवरात्र आहे. यानिमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक भक्तांसाठी त्र्यंबकराजाच्या मंदिराचे कवाडे रात्रभर उघडी असणार आहेत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर प्रशासनाने मंदिर मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवारात्रीचा उत्साह दिसून येत आहे. भाविकांनी आज सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर मंदिराला अत्तयंत महत्व असल्यामुळे भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. गर्दीमुळे प्रत्येकाचे दर्शन व्हावे सर्वांना त्र्यंबक राजाचा आशिर्वाद मिळावा यासाठी मंदिर रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान रात्रभर खुले राहणार असून आज पहाटे ४ पासून उद्या रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना त्र्यंबक राजाचे दर्शन घेता येणार आहे. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने उपाययोजना केल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरता गर्भग्रह दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

त्र्यंबक राजा सजणार; महाशिवरात्रीनिमित्त अजून काय खास..?


महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले आहे. त्यासोबतच भाविक भक्तांना महाप्रसादाचा देखील लाभ घेता येणार आहे. देणगी दर्शन दिवसभर सुरू राहणार असून देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरता सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप देखील उभारलेला आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी झाली आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर (On the occasion of Mahashivratri Trimbakeshwar temple is open all night) खुले राहील. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांची श्री त्र्यंबक राजाचे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरता गर्भ ग्रह दर्शन बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आली आहे.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे तीन दिवसांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.