जवळपास महिना झाला तरी अद्याप राज्यात मंत्रिमंडळ नाही, राज्यात पूरपरिस्थिती असताना मंत्रिमंडळ असणे गरजेचे, विरोधी पक्षनेते राज्यात दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करताय लोकांची दुःख समजून घेताय यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी बोध घ्यावा असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी नाशिक दौऱ्यावर असताना काढले आहेत. तसेच स्थानिक निवडणुकांत मविआचा प्रयोगा राबवण्याची चर्चा सुरु असून, सध्यातरी आमच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे.
शरद पावर हे नाशिक दौऱ्यावर असून ते आत्ताच नाशिक विमानतळवरून एमरॉल्ड पार्क या हॉटेल मध्ये दाखल झाले आहेत, शरद पवार हे रात्री नाशिक मध्ये मुक्कामी असून उद्या सकाळी (दि.३०) धुळ्यातील एका कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. ते नाशिक मधील एमरॉल्ड पार्क या तारांकित हॉटेलमध्ये असून त्यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की, ‘राज्यात सरकार स्थापन होऊन जवळपास महिना झाला अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, राज्यात पूरस्थिती असताना दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक आहे. अशी अशी कान टोचणी शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारची केली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करताय, शेतकरी संकटात सापडला आहे त्याला धीर देताय, यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा असा सल्ला देखील शरद पवार यांनी दिला आहे.
न्यायालयाने दिलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर देखील ते बोलले, न्यायालयाने ओबीसी अरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. याने मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मविआ च्या काळातील सर्व प्रकल्पांना धडाधड स्थगिती दिली, त्यावरही शरद पवारांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आमच्या सरकारने मंजूर केलेले टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही,
खासदार संजय राऊतांनी सरकार शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असे वक्तव्य केले होते, त्यावर बोलताना पवार म्हणाले की सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी काही ज्योतिष नाही, मात्र निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका घ्यायचा की नाही विचार चालू आहेत, मात्र आमच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी सध्या अशी आमची भूमिका आहे. निवडणुका होतील तेव्हा जनता कौल देईलच.