सामाजिक माध्यमातील (social media) जगप्रसिद्ध मेटा (meta) कंपनीने आपल्या काही गोपनीय धोरणात बदल केले असून नवे गोपनीयता धोरण ‘प्रायव्हसी पॉलिसी’ वापरकर्त्यांसाठी आणले आहे. बऱ्याचश्या सोशल माध्यमातील कंपन्यांचे गोपनीयता धोरण हे डेटा सुरक्षेच्या दृष्टीने वापरकर्त्यांना बांधील असते, परंतु आता मेटाच्या नवीन धोरणानुसार फेसबुक (Facebook), मेसेंजर (Messenger) आणि इंस्टाग्राम (Instagram) वापरकर्ते हे बांधील नसणार आहे. कंपनी वैयक्तिक डाटा (personal data) कधी, कसा आणि कोणत्या कारणासाठी वापरते हे युजर्सला समजणार आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅसेंजरवर ग्राहकांना मिळणाऱ्या सुचनांबाबतीत मेटाच्या नवीन धोरणानुसार माहिती देणार आहे. त्याच्या क्षेत्रांमध्ये प्रासंगिक पॉलिसी आणि सेवासह नियम राहणार आहेत. सारांशरुपात यामध्ये पाहता येणार आहे. यासह सर्व बदलणारे नियम येत्या २६ जुलैपासून लागू होणार आहेत. कोणत्याही ग्राहकांनी काही कारणास्तव सेवांमध्ये व्यत्यय (disturbance) आल्यास, तक्रारी करण्याची गरज भासणार नसल्याचे मेटाने म्हटलं आहे.
काय आहे नेमकी नवीन गोपनीयता पॉलिसी..?
भारतासह अमेरिका (America), ऑस्ट्रलिया (Australiya) आणि अनेक युरोपियन देशांनी मेटा या कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध केला होता. त्यानुसार, सोशल मीडियातील नामांकित कंपनी मेटाने पुन्हा एकदा आपल्या गोपनीयता धोरणात सुधारणा केली आहे. या नवीन पॉलिसीचे नाव ‘गोपनीयता पॉलिसी’ असून फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामसाठी त्यांची डेटा धोरणे अद्ययावत करणार असल्याची माहिती देखील मेटाने दिली आहे. यानुसार फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम युजर्सला (users) त्यांची वैयक्तिक माहिती कंपनी कधी, केव्हा आणि कोणत्या कारणासाठी वापरत आहे, हे कळणार आहे. कंपनीने सांगितले की, गोपनीयता पॉलिसी ही २६ जुलैपासून लागू करण्यात येणार असून, या पॉलिसीमुळे (policy) वापरकर्त्यांना लोकेशन संबंधित तपशीलसह इंटरनल प्रोटोकॉल अड्रेसचीही (Internal Protocol Address) माहिती मिळणार आहे. तसेच पॉलिसी व्यतिरिक्त फेसबुक, मेसेंजर व इंस्टाग्रामच्या सेवेला कालावधीही युजर्सच्या गरजेनुसार अपडेट (update) करण्यात आला असल्याचे मेटाने सांगितले आहे.
नवीन गोपनीयता धोरण स्वीकारणे बंधनकारक नाही…
भारत सरकारने मेटाला नागरिकांच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होईल असे धोरण न बनवण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यामुळे भारतीय वापरकर्त्यांना मेटाचे नवीन गोपनीयता धोरण स्वीकारणे बंधनकारक राहणार नसल्याचे सांगून, आपले नवीन गोपनीयता धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील यूज़र्स त्यांच्या इच्छेनुसार नवीन गोपनीयता धोरण गरजेनुसार स्वीकारू शकतात. त्यामुळे भारतातील युजर्सला मेटाचा कोणताही प्लॅटफॉर्म (platform) वापरताना कुठल्याही अडचणी येणार नाही.