उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार या चर्चाना आता त्यांची ब्रेक लावला आहे.

काय आहे ट्वीट ?
या ट्विटमधून मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीची छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच नार्वेकर यांनी इथून काही अंतरावरच असलेल्या बंगाल क्लबच्या देवीचे दर्शनही घेतले. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची पाहणी केली.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते
मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला होता, ते म्हणाले होते, की मिलिंद नार्वेकर हे देखील आमच्या सोबत येताय. त्यांच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली होती. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे उजवा हात मानले जातात. त्यामुळे त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला असता. मात्र आता मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजीपार्कवर जात या चर्चाना आता ब्रेक लावला आहे.

ठाकरे गट तसेच शिंदे गट यांच्याकडून दोन वेगवेगळे शिवसेना दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही गटाने आपली पूर्ण ताकद लावत शिवसैनिकांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा घुमणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.