औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचा मुकमोर्चा

औरंगाबाद: ठाकरे सरकार मावळले पण मावळता मावळता त्यांनी शेवटचे काही जीआर काढले. त्यातला एक वादग्रस्त निर्णय म्हणजे औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) असे करणे. या निर्णयावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज एमआयएम (AIMIM) व काही सामाजिक संस्थाकडून मूक मोर्चा काढण्यात आला.

एमआयएमच्या या मुकमोर्चाचे औरंगाबाद येथे आंबेडकर पुतळा, भडकल गेट ते आमखास मैदान पर्यंत आयोजन केले होते. या मोर्चात कोणत्याही जातीचे-धर्माचे तसेच कोणत्याही पक्षाच्या लोकांनी हजर राहून निषेध नोंदवावा असे आवाहन, औरंगाबादचे खासदार जलील यांनी केले. औरंगाबादचे नामकरण हा तत्कालीन सरकारने केलेला विश्वासघात असल्याचा आरोप जलील यांनी केला. तसेच औरंगाबाद नावासोबत तेथील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहे. आपली एक ओळख निर्माण झाली आहे. मात्र स्वार्थी राजकारणासाठी हा निर्णय मविआकडून घेण्यात आला असून,
या नामांतराच्या विरोधात आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करणार असल्याचं यावेळी खासदार जलील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

‘संभाजीनगर’ अशा नामांतरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे लोकांना मूर्ख बनवत आहेत. या लोकांचे कपडे काढले तर हे लोक आतून ‘RSS’चेच लोक सापडतील अशी टीका ही एमआयएम चे खाजदार इम्तियाज जलील यांनी केली. ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेऊन सांगितले होते की, औरंगाबाद शहराला आधी पाणी, रस्ते आणि विकासात्मक सुविधा उपलब्ध करून नामांतर करू. मग औरंगाबादला सर्व सोयी सुविधा पोहचल्या का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला. पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न न मिटवताच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे, हा औरंगाबादच्या लोकांचा विश्वासघात आहे. स्वतःच्या राजकिय फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप खाजदार जलील यांनी केला आहे.