आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

नाशिक : पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. आज सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला निघाले आहेत. या भेटीत नक्की काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीत सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार का यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, ‘ नाशिक पदवीधरसाठी आमचा उमेदवार नव्हता, त्यामुळे सत्यजित तांबे यांना आमच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या निवडणून येण्यात त्यांचे सहकार्य आहे. सत्यजित तांबे माझ्या भेटीला येत असल्याचा त्यांचा निरोप देखील आलाय, सध्या सत्यजित तांबे भाजपात येतील का नाही यावर मी काही बोलणार नाही, मात्र या भेटीत आम्ही चर्चा करणार आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

सत्यजित तांबे यांनी बंड करत नाशिक पदवीधरमध्ये अर्ज दाखल केला. आणि यात ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांना भाजपनेही साथ दिली होती. त्यात भाजपचे स्थानिक नेते आणि खास करून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांना विशेष मदत केल्याचे उघड दिसत होते. मात्र सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करावा असा त्यांचा मानस होता.

सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषद घेत, मागील काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडमोडी काय होत्या त्याला स्पष्टता दिली. तसेच त्यांनी त्यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे याबद्दल देखील सांगितले. मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले होते. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं होत. 

मात्र आमदार सत्यजित तांबे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. या भेटीत नक्की काय खलबत होताय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.