मुंबई: गेल्या दोन तीन वर्षांपासून जगभरात कोरोना (corona) महामारीने (pandemic) थैमान घातलेले असताना आता जगभरात मंकीपॉक्सने (monkeypox) भीती वाढवली आहे. आतापर्यंत १९ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण (patient) आढळून आले आहे. यातील १३१ रुग्णांना मंकीपॉक्स असल्याचे स्पष्ट झाले, तर काही संशयित रुग्ण आहेत.
आतापर्यंत ऑस्ट्रिया, स्लोव्हिनिया, झेक प्रजासत्ताक, यूएई (UAE), ब्रिटन (England), फ्रांस, स्वीडन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलंड, इस्त्राईल, स्वित्झर्लंड आणि उत्तर अमेरिका या देशांत मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला आहे. सुदैवाने या आजाराने सध्या तरी एकही मृत्यूची नोंद नाही. मात्र, ही साथ आणखी पसरण्याची शक्यता आहे. या आजाराला मंकीपॉक्स संबोधले जात असले तरी, हा आजार माकडापासून होत नाही. हा आजार विविध प्रजातींना संक्रमित करू शकतो.
काय आहे मंकीपॉक्सची लक्षणे… (symptoms) या आजाराची सुरुवात डोकेदुखी आणि ताप यातून होते. अंगदुखी, सूज आणि पाठीत वेदना होतात. ताप आल्यानंतर साधारण तीन दिवसांनी अंगावर फोड, पुरळ येतात. याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या अन्य भागावर हे पुरळ येतात. हा संसर्ग साधारण चार आठवड्यांपर्यंत राहतो.
मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव कसा होता… (how it spreads) मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव प्राण्यांपासून मनुष्यास तसेच मनुष्यापासून मनुष्यास होऊ शकतो. हा विषाणू लहान जखमा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. जनावरांनी ओरखडल्याने किंवा चावल्याने, तसेच वन्य प्राण्यांचे मांस खाणे या माध्यमांमधून या विषाणूचा प्रसार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत होऊ शकतो.
मंकीपॉक्सवर उपाय… (remedies) लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती कमी करण्यासाठी योग्य तो औषधोपचार देण्यात येतो. उपचार म्हणून रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते.