Video : वनविभागाने घडवून आणली आई आणि बछड्याची भेट


त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

वनविभागाने मादी बिबट आणि पिल्लाची भेट घडवून आणली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली परिसरात एका मक्याच्या शेतात बिबट्याचा बछडा सापडला होता. वनवनविभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत बछड्याला ठेवले होते.

बिबट्या मादीने आपल्या बछड्यास रात्रीच्या सुमारास अलगद उचलून नेले. यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

आंबोली येथे दुपारच्या सुमारास बबन लक्ष्मण मेढे हे आपल्या शेतात पाणी भरत असताना साधारण एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले. त्यांनी पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे पाटील यांना कळवले. मेढे यांनी यांनी वनरक्षक नवनाथ गोरे यांना संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. तसेच घटनेची माहिती मिळताच श्याम गायकवाड, वनपाल नवनाथ गोरे वनरक्षक कैलास महाले यांनी सदर जागेवर जाऊन पिल्लाची खात्री केली होती.

राजेश पवार( RFO) यांना घटनेची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली पिल्लू लहान असल्यामुळे पिल्लाला तिचे आईचे ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार Eco Echo foundation चे सभासद अभिजित यांचेशी संपर्क करून घटनास्थळी बोलावुनन सदर पिल्लास सुरक्षितरित्या शेतात टोपलीत ठेवले. तसेच ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला.

त्यांनतर सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मादी बिबट्याने अलगद आपल्या पिल्लास उचलून नेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. मात्र या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.